मलकापूर शहरात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत द्यावी – काँग्रेसची मागणी

MALKAPURAM NEWS
By -shaikh isa
0

"मलकापूर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त परिसर
17 सप्टेंबर 2025
 मलकापूर शहर व तालुक्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांना पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे. तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.


अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान


मलकापूर शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले. जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असून नागरिकांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत.


प्रभावित भाग


नदीकाठी वसलेल्या परिसरात पाणी घुसून विशेष नुकसान झाले आहे. यात पारपेट परिसर, मुस्ताक अली नगर, मदार टेकडी, गुलाब बाबा खान का परिसर, ताज नगर, हाशमी नगर, कुरेशी नगर, सालीपुरा, जावई नगर, माता महाकाली नगर, विकास नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर आदी परिसरांचा समावेश आहे.


काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी


शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनावर हाजी रशीदखान जमादार, युसुफ खान, प्रमोद अवसरमोल, एड. जावेद कुरेशी, हाजी रईस खान जमादार, एजाज शहा, शोएब लाला, साजिद खान, अनिल मुंदोकार, राजू उखर्डे, जाकीर मेमन, फिरोज खान, आयुब शहा, अशरफ पेंटर, सलीम एम.एस., इकबाल खान, एस.एम. साजिद, सादिक शेख, एहसान खान, जावेद ठेकेदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मलकापूर शहरातील नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली असून, यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मलकापुर में भारी बारिश से नुकसान, जिलाधिकारी को निवेदन देकर तत्काल सानुग्रह अनुदान की मांग

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
5/related/default